Top Tags

क्राईम

आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23 अन् 15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपल !
आईचं वय 45 अन् प्रियकराचं 23 अन् 15 वर्षीय मुलीला कळताच सगळंच संपल !

आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या अनैतिक प्रेमसंबंधांची किंमत तिच्या 15 वर्षांच्या निष्पाप मुलीला चुकवावी लागली. मृत मुलीच्या आईच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या 23 वर्षीय प्रियकराने मुलीला क्रूरपणे संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा उलगडा केला तेव्हा सत्य ऐकून अधिकारीही थक्क झाले. राधिका असं या 15 वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. जंगलात जळालेल्या अवस्थेतील तिचा मृतदेह सापडला होता. पंजाबच्या नवाशहर परिसरातील ही घटना आहे

आईचे गोपीशी अनैतिक संबंध मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय आई उषा राणी हिचे तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या गुरविंदर सिंग उर्फ गोपी (23) याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधांमध्ये तिची 15 वर्षांची मुलगी अडथळा ठरत होती. याच रागातून आरोपी गुरविंदरने मुलीला घरात एकटे पाहिले आणि अत्यंत निर्घृणपणे तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि जंगलात नेऊन जाळला

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी गुरविंदर याला तातडीने अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या धक्कादायक कटात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची कसून चौकशी या पोलीस कोठडीदरम्यान केली जात आहे.

 

 

साहेब पैशाच्या मोहापायी तुमचंच कॅरेक्टर खराब झालं..
साहेब पैशाच्या मोहापायी तुमचंच कॅरेक्टर खराब झालं..
आई – वडील माझ्या मृत्यूला जबाबदार… म्हणणाऱ्या युट्यूबरचं धक्कादायक सत्य समोर, बायकोला बेदम मारहाण आणि…
आई – वडील माझ्या मृत्यूला जबाबदार… म्हणणाऱ्या युट्यूबरचं धक्कादायक सत्य समोर, बायकोला बेदम मारहाण आणि…
hi test

राजकिय

जालन्यात गंगासागर अपार्टमेंटमध्ये अनैतिक वेश्या व्यवसायावर धाड…
जालन्यात गंगासागर अपार्टमेंटमध्ये अनैतिक वेश्या व्यवसायावर धाड…
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की मंठा चौफुली जालना येथील श्रीजी हॉटेलच्या पाठीमागे लक्ष्मीनगर काळु पिठाची गिरणी जवळील गंगासागर अपार्टमेंटमध्ये घर मालक हा स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बाहेरुन महिलांना आणुन त्या ठिकाणी ठेवुन बाहेरील ग्राहकांना बोलवुन त्यांच्या कडुन अनैतिक वेश्या व्यवसाय करीत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्या वरुन सदर माहीती बाबत मा. पोलीस अधिक्षक सो यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या सुचनेप्रमाणे स्थागुशाचे पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी व स्टाफचे अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता, गंगा सागर अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्या वरील मालक उत्तम केंद्रे (फरार) सुरेखा उत्तम केंद्रे वय – 42 वर्ष दोघेही रा. गंगा सागर अपार्टमेंट ता. जि. जालना ग्राहक अशोक विष्णु हावरे वय-24 वर्ष रा. रोहनवाडी ता.जि. जालना असे मिळुन आले त्यांच्या ताब्यात 5410/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुण. आला आहे. पोलीसांची चाहुल लागल्याचा अंदाज येताच वरील आरोपी यांनी संगनमत करुन दोन महिला व एक ग्राहक यास पळवुन लावले आहे. वरील फरार आरोपी ग्राहक व पळवुन गेलेला अज्ञात एक ग्राहक दोन अज्ञात महिला यांच्या विरुद्ध महीलांच्या
अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे प्रभारी अधिकारी ओ. मा.वा.प्र. कक्ष गणेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे तालुका जालना हे करत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली अ.मा.वा.प्र. कक्षाचे प्रभारी अधिकारी गणेश शिंदे, रवी जोशी, संजय गवळी, महिला अंमलदार संगिता चव्हाण, निमा घनघाव, आरती साबळे व चालक संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे.
hi test
error: Content is protected !!