5 कोटींच्या खंडणीसाठी तुकाराम मुंडेचं अपहरण करण्यात आले. बीडमध्ये हा अपहरणाचा थरार पहायला मिळाला.

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून अपहरण करण्यात आले. यानंतर या व्यक्तीची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा परिसरात सुटका झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव तुकाराम मुंडे असे आहे. या अपहरणाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे

 

अपहरणकर्त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांकडे तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती असून, पोलिसांचा दबाव वाढत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी त्यांना धोत्रा गावाजवळील सुनसान रस्त्यावर डोळ्यांवर पट्टी बांधून सोडून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. तुकाराम मुंडे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड) हे परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रत कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. 4 जून 2026 रोजी दुपारी काम आटोपून घरी परतत असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांचे जबरदस्तीने चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. या घटनेनंतर कुटुंबीयांकडे मोठ्या रकमेची खंडणी मागण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, बीड पोलिसांचे गुन्हे अन्वेषण पथक आरोपींचा शोध घेत विविध ठिकाणी तपास करत अमरावती पर्यत पोहोचली होती

 

7 जून रोजी धोत्रा परिसरातील रस्त्यालगत डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत सोडण्यात आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी मदतीसाठी हाक मारली. त्याचवेळी त्या मार्गाने दुचाकीवरून जात असलेले प्रसन्ना घेमराज मांडवकर (रा. आंजदा वर्धा) यांना त्यांना पाहून मदत केली. मुंडे हे घाबरलेल्या अवस्थेत असल्याने काहीतरी गंभीर प्रकार घडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी मुंडे यांनी आपल्यासोबत घडलेली संपूर्ण आपबिती सांगितली.

 

प्रसन्ना मांडवकर यांनी प्रसंगावधान दाखवत तुकाराम मुंडे यांना आपल्या दुचाकीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांशी तसेच परळी वैजनाथ पोलिसांशी संपर्क साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर तुकाराम मुंडे यांना पुढील तपासासाठी परळी वैजनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!