साहेब पैशाच्या मोहापायी तुमचंच कॅरेक्टर खराब झालं.
आठवतेत का हे साहेब? शेतकऱ्याच्या पोराला म्हणाले होते तुझं कॅरॅक्टर खराब करून टाकीन.. हो हो.. लक्षात आलं असेल तुम्हाला कानडी घाट या बीड तालुक्यातील गावांमध्ये पवनचक्की कंपन्यांची बाजू घेत शेतकऱ्यांच्या पोराला धमकावणाऱ्या पोलिसाचेच आता 10 हजारांची लाच घेताना कॅरेक्टर खराब झाले आहे..

आज नेकनुर येथे अपघातग्रस्त कुटुंबास मदतीसाठी लागणारे पोलिस पंचनामा सबंधित कागदपत्रे देण्यासाठी 10 हजारांची लाच मागताना बळवंते म्हणून पोलिस साहेबांचे कॅरेक्टर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कॅरेक्टर खराब करून टाकले आहे.. साहेबांना रंगेहाथ पकडल्याने यावेळी त्यांना काहीही दमदाटी करता आलेली नाही..

शेतकऱ्याच्या पोराला दम देताना साहेबांना वाटले नसेल की एक दिवस त्यांच्यावरही असेच पैशाच्या मोहापायी कॅरेक्टर खराब करून घ्यायची वेळ येईल.. खरंतर देवाच्या काठीचा मार एकदा बसला की तो असा बसतो.. आवाज पण निघत नाही अन् तिथं कॅरेक्टर पण चांगल राहत नाही.. खराब होऊन जातं ओ…

साहेब.. चार आठ दिवसांनी जेव्हा बाहेर याल तेव्हा उपकार करून कुण्या शेतकऱ्याच्या पोराला कॅरेक्टर ची धमकी देऊ नका बस एवढीच विनंती आहे बघा..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!