पुणे
राजकिय
संपादकीय
डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न
डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. मिन्नू पी.एम. यांच्या पुढाकाराने डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशन व छाया डेंटल क्लिनिक, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी मोफत दंत तपासणी व मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले.
या उपक्रमात डॉ. गोविंद भताने, डॉ. किरण अंभोरे व त्यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय टीमने जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दंत तपासणी करून मौल्यवान सल्ला दिला. शिबिरादरम्यान खालील विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. रूट कॅनॉल ट्रीटमेंटच्या आधुनिक पद्धती, इंप्लांट व अत्याधुनिक दंत प्रत्यारोपण तंत्रज्ञान, दात स्वच्छता (स्केलिंग) व त्याचे महत्त्व, तंबाखू व गुटखा सेवनामुळे होणारे तोंडाचे दुष्परिणाम व सवय सोडवण्यासाठी मार्गदर्शन, दंत आरोग्य, तोंडाची स्वच्छता व दातांच्या देखभालीबाबत जनजागृती, ज्यांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी फाऊंडेशनच्या वतीने योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिन्नू पी.एम. यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सुदृढ दात म्हणजे सुदृढ आरोग्याचा पाया. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याची जागरूकता वाढते आणि कार्यक्षमता सुधारते. या वेळी शिरीष बनसोडे (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी), राजेंद्र तुबखले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), पठारे (प्रकल्प संचालक – DRDA), डॉ. प्रशांत चौधरी (उपायुक्त – पशुसंवर्धन विभाग) तसेच श्री. वैभव ढवळे उपस्थित होते. शिबिरात जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व दंतचिकित्सकांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

क्रिडा
अंकुशराव टोपे महाविद्यालयात चार भाषिक वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार सोहळा!
राष्ट्रीय
व्यापार
तेरा वर्षांचा अंधार मिटला… भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दूर केला श्रीरामनगर वस्तीचा अंधार
तेरा वर्षांचा अंधार मिटला… भाजपा नेते सतीश घाटगे यांनी दूर केला श्रीरामनगर वस्तीचा अंधार अंबड: गेल्या तेरा वर्षांपासून अंधारात असलेल्या दाढेगाव येथील शेतकरी आणि शेतमजुरांच्या श्रीरामनगर वस्तीमध्ये अखेर प्रकाशाची वात…
डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न
डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर संपन्न जालना : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. मिन्नू पी.एम. यांच्या पुढाकाराने डॉ. भताने’ज छाया फाऊंडेशन…