संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, आजच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका काय आहे?  सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर संसदेत चर्चाच घडू द्यायची नाहीये. ही जी भीती आहे ती राहुल गांधी यांची भीती आहे. कारण राहुल गांधी यांच्याकडून भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण, गुप्तचर तडजोरी याच्याबाबत त्यांच्या हातात अत्यंत महत्वाची माहिती आहे. राहुल गांधी जे बोलला, जे प्रश्न उपस्थित करतात, त्यावर भाजपाच्या सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते. युद्ध भारताच्या सीमेवर आले आहे. अमेरिकेने भारताच्या सागरी हद्दीमध्ये हल्ला करून इराणीची जहाज बुडवली आहे आणि ज्यात 100 वर इराणी सैनिक मारलेले आहेत. स्वत: मोदी युद्धाच्या दोन दिवस अगोदर इस्त्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही.पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, मग तुम्ही शांततेच्या बाजूने कसे? जो इराण आपल्या वर्षानुवर्ष मित्र आहे, त्याचे सर्वाेच्च नेते मारले जातात आणि तुम्ही साधा शोकही व्यक्त करत नाहीत. मग ही तुमची कसली शांतता? ही षंड्यांची शांतता आहे. ऐरव्ही आमचे विश्वगुरू जगाला संदेश देत असतात ते आज शांत आहेत.एपस्टीन त्या कॅबिनेटच्या सदस्य आहेत, त्यांनी या मुद्द्यात बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस दादांच्या स्मारकाच्या गोष्टी करत आहेत. या रस्त्याला नाव देऊ… ते ठीक आहे. पण यापेक्षा महत्वाचे आहे की, त्यांचा मृत्यू संशयास्पद झाला, त्यावर बोलणे आणि माहिती देणे किंवा अहवाल येईल, त्यानंतर त्यावर बोलू हे त्यावरील उत्तर नाहीये, असे राऊतांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!