जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं दुचाकीवरून जाणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. हा तरुण रस्त्याने जात असताना रस्ता मोकळा होता. तो कशालाही धडकला नाही किंवा खालीही पडला नाही. वेगही मर्यादीत होता, तरीही तरुणाला मृत्यूनं गाठलं. भररस्त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश केशव गावंडे असं मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. हा तरुण शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आनवा येथून भोकरदन शहराकडे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. काही कळायच्या आतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. हा झटका इतका तीव्र होता की, गणेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यावरच कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!