
अखेर जालना शिवसेना भाजप महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे नेमकं काय घडलं पहा,मात्र राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय
जालना ( प्रतिनिधी ) ; मागील दोन ते तीन दिवसापासून सातत्याने भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका आणि चर्चेचा ससेमेरा सुरू होता त्यामुळे नेमकं जालन्यात भाजप शिवसेना महायुती होणार का याबाबत इच्छुक उमेदवारांसह दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होतं, भाजप पक्षात महायुती होऊस नये यासाठी मागणी करण्यात येत होती तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील माहायुतीच्या बैठकीतुन काढता पाय घेतला आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा केली त्यामुळे भाजप शिवसेना महायुती होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र अखेर आज रोजी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार अखेर जालना भाजप शिवसेना महायुतीचा मार्ग मोकळा झाला असून शिवसेना भाजप एकत्रितपणे जालना महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आणी महापौर सुद्धा महायुतीचा होणार अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे…..
सविस्तर बातमीसाठी पाहत राहा
@mhjalnanews
आवाज जालनेकरांचा…..
https://youtube.com/@mhjalnanewsmh21?si=Q9jeydm4vAhGBgtk
www.mhjalnanews.com
