अमेरिका,इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच असून, यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. जोपर्यंत युद्धाचा उद्देश पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार अशी थेट घोषणाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत अमेरिकेनं आणि इस्त्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत, अमेरिकेकडून इराणवर धडकी भरवणारे हल्ले करण्यात आले. तर इराण देखील काही कमी नाही, इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. इराणकडून तर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील लक्ष्य करण्यात आलं.दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं प्रथमच असं पाऊल उचललं आहे, त्यामुळे आता जग तिसऱ्या महायुद्धाच्या जवळ आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतामधून इराणमध्ये परतत असलेली वॉरशिप अमेरिकेनं हिंदी महासागरात बुडवली आहे. या घटनेला अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून देखील दुजोरा देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्यावर एक वॉरशिप बुडालं त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जहाजावरील 101 जण बेपत्ता आहेत, तर 78 जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान याबाबत आता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं माहिती देताना सांगितलं की, अमेरिकेची पानबुडी टारपीडोने हल्ला करत आम्ही इराणचं वॉरशिप बुडवलं. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर तब्बल 80 वर्षांनंतर अमेरिकेनं या पद्धतीचा पहिला हल्ला केला आहे.यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, ही किती मोठी घटना आहे. त्यामुळे आता जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या युद्धामुळे भीषण इंधन संकट देखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!