उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक हादरवणारी घटना घडली आहे. तिथे एका 23 वर्षांच्या विवाहीत महिलेने लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मात्र मृत्यूपूर्वी तिने एक इमोशल सुसाईड नोट लिहील होती. ज्यामध्ये तिने तिचया पतीला, त्यांच्या छोट्याशी ( दीड महिने) लेकीची काळजी घेण्याची विनंती केली. या घटनेने सगळेच हादले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका असं मृत महिलेचं नाव असून, अवघ्या वर्षभरापूर्वीच तिचं अजमतपुर मध्ये राहणाऱ्या विशालशी लग्न झालं होतं. त्यांना अव्घाय दीज महिन्याची छोटी मुगी देखील आहे. शनिवारी, या जोडप्याने त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मात्र रविवारी दुपारी, घरातील सगळे पुरुष कामावर गेले होते, तर घरातील महिला या शेळ्या चारायला घेऊन गेल्या असतानाच, प्रियांकाने तिच्या खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा तिची वहिनी घरी परतली आणि तिला प्रियांकाची दीड महिन्याची मुलगी रडताना दिसली, तेव्हा तिने आत पाहिल्यावरती हादरली, समोर प्रियांकाचा मृतदेह लटकलेला आढळला.

या घटनेने सगळ्यांना धक्का बसला, सर्वांवर दु:खाचा डोंगरच कोसळला, शेजारी-पाजारीही जमले. कोणीतरी पोलिसांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तेथून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली, ती वाचल्यावर सर्वांचे डोळे पाणावले. मृत्यूपूर्वी प्रियांकाने ही चिठ्ठी लिहीली होती. “माझ्या प्रिय मुलीची काळजी घे. मला काहीही समजलं, नाही, पण तू काही ( जीवाचं बरवाईट) करू नकोस, नाहीतर आपल्या मुलीची काळजी कोण घेईल? आनंदाने जग, यार. ओके बाय.” असं तिने लिहीलं होते. या चिठ्ठीच्या शेवटी “बाबूजी” असेही लिहीलं होतं, ते कोणासाठी, नेमकं कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत.

प्रियांकाच्या मृत्यूनंतर, तिचे आई-वडील आणि सासरच्या लोकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. मृत महिलेची आई गीता हिने असा आरोप लावला की, हुंड्याच बाईक आणि सोन्याच्या चेनची मागणी करत जावई विशालने आमच्या मुलीला त्रास दिला होता. आणि त्यानेच तिची हत्या केली. मात्र , पत्नी प्रियांका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती आणि या तणावाखाली त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा तिचा पती विशालने केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे आणि हस्तलेखन तिचंच आहे का हे पडताळून पाहण्यासाठी त्याची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच हे आत्महत्येचे प्रकरण आहे की सखोल कट आहे हे स्पष्ट होईल असं अत्रौली पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश चंद्र यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!