अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केलेले. आता गोविंदा याने 90 च्या दशकात एका अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 90 च्या दशकात गोविंदा याने एकापेक्षा एक सिनेमे देत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत गोविंदा याने स्क्रिन शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं… त्याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी…
आजही नीलम आणि गोविंदा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. विवाहित असताना गोविंदा यांचं नाव नीलम हिच्यासोबत जोडलं जात होतं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, गोविंदा याने नीलम हिच्यासोबत असलेल्या तिच्या नावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे…नुकातच झालेल्या एका मुलाखतीत, गोविंदा याला निलम हिच्यासोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं… यावर गोविंदा म्हणाला, ‘आमच्यासारख्या गावतल्या मुलांना गोऱ्या मुली प्रचंड आवडतात… ते एक प्रकारचं आकर्षण असतं आणि के स्वाभाविक आहे… नीलम खूप वेगळी होती आणि ती खूप चांगली होती… तिला पाहिल्यानंतर असं वाटायचं की, एखाद्या बाहुलीसारखी आहे…’नुकातच झालेल्या एका मुलाखतीत, गोविंदा याला निलम हिच्यासोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं… यावर गोविंदा म्हणाला, ‘आमच्यासारख्या गावतल्या मुलांना गोऱ्या मुली प्रचंड आवडतात… ते एक प्रकारचं आकर्षण असतं आणि के स्वाभाविक आहे… नीलम खूप वेगळी होती आणि ती खूप चांगली होती… तिला पाहिल्यानंतर असं वाटायचं की, एखाद्या बाहुलीसारखी आहे…’
